जळगाव जिल्हा कोतवाल पद भरती 2023
जळगाव जिल्ह्यातील ०७ उपविभागातील १५ तालुक्यातील सजेतील कोतवाल या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता अर्हताधारक उमेदवारांकडून नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीनेच https://jalgaon.ppbharti.in या संकेत स्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत. विहित

मा. शासनाकडील पत्र क्र. संकीर्ण- २०२३/प्र.क्र.१७/ई-१० दि.१७ मे २०२३ अन्वये सन २०२३- (कोतवाल पदभरती) बाबत कोतवाल संवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या ८० टक्के मर्यादेत पदे भरण्यास एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक : ३१/०७/२०२३ या संकेतस्थळावर
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क जमा करण्याचा अंतिम दिनांक ३१/०७/२०२३bकोतवाल भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरातbhttps://jalgaon.ppbharti.inbउपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.bप्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरून विहित ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज व विहित चलनाद्वारे भरलेले परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. भरती प्रक्रिया/ परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशत: बदल करणे, पदांच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे अधिकार तसेच भरतीप्रक्रियेसंदर्भात वाद, तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित अध्यक्ष निवड समिती तथा उपविभागीय अधिकारी यांना राहतील.