Take a fresh look at your lifestyle.

जळगांव RTO पदभरती सूचना; 100 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश

0

गेल्या अनेक वर्षांपासून जळगांव जिल्ह्याची मागणी पुर्णत्वास येऊन जळगांव RTO ला प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा दर्जा प्राप्त झाला. आता त्यासाठी 100 अधिकारी कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आले आहे.

जळगांवसह राज्यातील 9 उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांना आरटीओ चा दर्जा देण्याबाबत शासनाने 23 जुनच्या निर्णयाद्वारे मान्यता दिली.

पदभरतीच्या सुचना- दर्जा बदलल्याने नव्याने निर्माण होणारे पदे व अतिरिक्त पदांच्या भरावयाच्या फेर वाटप, नवीन पदांची भरतीस शासनाची मंजुरी देऊन तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही या शासननिर्णयद्वारे देण्यात आली आहे.

जळगावात 100 पदे- जळगावात उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास RTO चा दर्जा बहाल केल्यानंतर आता त्यासाठी आवश्यक 100 अधिकारी कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. नव्याने निर्माण होणारी भरती प्रक्रिया ही लवकरच राबविण्यात येणार आहे.