राज्यात सहकार आयुक्तालयांतर्गत होणार मोठ्या पदांची भरती
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्वसानिमित्त राज्य सरकारने रिक्त जागांपैकी 75 हजार पदांची भरती विविध विभागांत करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार सहकार आयुक्तालयांतर्गत 751 पदांची भरती लवकरच केली जाणार असून, त्यापैकी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक व टंकलेखकांची मिळून 448 पदांची भरती होईल. 15 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती आयुक्तालयातून देण्यात आली.
शासनाच्या 30 सप्टेंबर 2022 च्या निर्णयानुसार ज्या विभागाचा आकृतिबंध (स्टाफिंग पॅटर्न) मंजूर आहे, अशा विभागातील रिक्त जागांपैकी शंभर टक्के तर उर्वरित विभागांपैकी 80 टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे. सहकार विभागातील लिपिक व टंकलेखक पदांची मिळून 366 पदे आणि लेखापरीक्षकांची 82 मिळून एकूण 448 पदांची भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केली जाणार आहे.

त्यामध्ये सहकार आयुक्तालयात 26,
मुंबई- 36,
कोकण -25,
पुणे -38,
कोल्हापूर -30,
औरंगाबाद -33,
नाशिक- 66,
लातूर- 36,
अमरावती- 33,
नागपूर- 43
लिपिकांच्या तर लेखापरीक्षकांमध्ये मुंबईतील 29,
पुणे -17,
कोल्हापूर- 9,
औरंगाबाद -19,
नाशिकमधील 8 पदांचा समावेश आहे.
त्याबाबत राज्यातील सर्व विभागीय सह निबंधकांनी त्यांच्याकडील प्रशासन व लेखापरीक्षकांची सरळसेवा बिंदूनामावलीनुसार आरक्षणानुसार पदे निश्चित करावीत आणि त्यानुसारचे मागणीपत्र सहकार आयुक्तालयात पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसारचा प्रस्ताव आयुक्तालयाने शासनास 15 डिसेंबर 2022 रोजी पाठविला आणि शासनाने तो आयोगास दिला. त्यानंतर पहिली पूर्वपरीक्षा झाली आहे.