Take a fresh look at your lifestyle.

‘ही’ संस्था देत आहे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठी स्कॉलरशिप…

0

दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. कोटक एज्युकेशन फाउंडेशन (KEF), कोटक महिंद्रा ग्रुपच्या CSR अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीने संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप प्रोग्राम लॉन्च केला आहे.

आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांमधील 11+ वर्गातील गुणवंत विद्यार्थांना अधिक पुढील शिक्षण घेण्यास मदत होण्यासाठी कोटक ज्युनियर स्कॉलरशिप प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे.

या प्रोग्रामसह, KEF देशाच्या भावी पिढीचे सर्वांगीण शिक्षण आणि विकासासाठी आर्थिक मदतीच्या पलीकडे जाऊन तळागाळातील स्तरावर एक मजबूत आधार प्रणाली निर्माण करण्याचे ध्येय ठेवत आहे.

हा प्रोग्राम SSC, CBSE, आणि ICSE बोर्डच्या 11+ वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांच्या एका प्रारंभिक सत्रामध्ये विस्तारलेला आहे, त्यामध्ये आर्थिक मदतीच्या पलीकडे अनेक जोमदार संलग्नता गतिविधी समाविष्ट आहेत. जसे- प्रत्येक विद्यार्थ्यासाठी विशेष सल्ला, करियर मार्गदर्शन सत्रे, प्रवेश परीक्षा तयारीसाठी सहाय्य एक्सपोजर व्हिजिट्स आणि होम व्हिजिट्स.

कोटक ज्युनियर स्कॉलरशिपसाठी पात्रता

SSC/CBSE/ICSE परीक्षेमध्ये 85% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले आहेत आणि मुंबईमधील महाविद्यालयांमध्ये 11वी वर्गासाठी प्रवेश प्राप्त केलेला आहे.

कौटुंबिक उत्पन्न वार्षिक रू.3,20,000/- इतके आहे. MMR (मुंबई महानगर प्रदेश) मधून आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक https://kotakeducation.org/kotak-junior-scholarship