विद्यार्थ्यांनो, तलाठी भरतीची अर्ज करताय; तर ‘हे’ कागदपत्रे राहू द्या जवळ
प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
विविध सामाजकि व समांतर आरक्षणचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) अपलोड करणे अनिवार्य आहे.

अर्ज करताना सोबत ठेवायची कागदपत्रे
1) अर्जातील नावाचा पुराव ( एस. एस. सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
2) वयाचा पुरावा
3) शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
4) सामाजिकदृष्टया मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
5) आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे
6) नॉन क्रिमीलेअर
7) पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
8) पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
9) खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
10) अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
11) प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
12) भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
13) अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
14) अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.व, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
15) एस. एस. सी नावात बदल झाल्याचा पुरावा
16) मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
17) लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
18) विहित नमुन्यातील अनुभव प्रमाणपत्र ( ज्या संवर्गाकरीता लागू असल्यास)
19) MS-CIT प्रमाणपत्र शासन मान्य