विद्यार्थ्यांनो, तयारीत रहा, तलाठी पदभरती जाहिरात लवकर होणार प्रसिद्ध
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट- क) संवर्गातील एकुण- ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि. १७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन परिक्षा घेण्यात येईल.

परिक्षा वार व दिनांक:- (दि. १७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३) संभाव्य तारीख सुस्पष्ट नंतर जाहिर केली जाईल.
प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहिरातीची माहिती https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या लिंकवर उपलब्ध आहे. तसेच सदर जाहिरात सर्व विभागीय आयुक्त, व सर्व जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे.