भारत राखीव बटालियन क्र.5 व राज्य राखीव बल,गट क्र.19 करीता 441 नवीन पदे भरण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता..
भारत राखीव बटालियन क्र. ५ काटोल, नागपूर व राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१९,कुसडगांव,अहमदनगर करीता पुढील तक्त्यात नमूद केल्यानुसार “सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गाची अनुक्रमे १९१ व २५० अशी एकूण ४४१ नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
उपरोक्त भारत राखीव बटालियन, क्र-५, काटोल, नागपूर येथील “सशस्त्र पोलीस शिपाई” यांच्या १९१ पदांकरिता रु.७,८६,४७,६८८/- इतक्या आवर्ती खर्चास मान्यता देण्यात येत असून, सदरहू खर्च हा गृह विभाग “मागणी क्रमांक बी-१, २०५५-पोलीस,०४७१-भारत राखीव बटालीयन” या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.
तर,राज्य राखीव पोलीस बल, क्र – १९, कुसडगाव, जि अहमदनगर येथे “सशस्त्र पोलीस शिपाई” यांच्या २५० पदांकरिता रु.१०,२९,४२,०००/- येणा-या आवर्ती खर्चास मान्यता देण्यात येत असून, सदरहू खर्च हा “मागणी क्रमांक बी-१, २०५५- पोलीस,०१६८ – जिल्हा पोलीस बल” या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.
उपरोक्त दोन्ही कार्यालयासाठी संदर्भीय क्र. १ येथील दि.१३/९/२०१९ च्या शासन निर्णयाव्दारे येणारा अनावर्ती खर्च हा मंजूर केलेला आहे.

हा शासन निर्णय मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय सचिव समितीच्या मान्यतेनुसार व वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारीक संदर्भ क्र.२३६, दिनांक ०३/०५/२०२३ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.