नागरिकांनो, आता SMS द्वारे कळणार आपल्याला रेशन किती मिळाले…
रेशन कार्डधारकांना आपल्याला किती धान्य मिळाले. याचा एसएमएस आता मोबाइलवर येणार आहे. यासाठी कुटुंबातील सदस्यांचा मोबाइल क्रमांक शिधापत्रिकेला जोडण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे मूळ कार्डधारकांना धान्य मिळेल. शिवाय जेवढे नियतन आले आहे. तेवढे धान्य कार्डधारकांना मिळणार आहे. त्यात कुणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले मोबाइल सिडिंग करणे हिताचे आहे.
मोबाइलवर कळणार किती मिळाले धान्य – रेशन कार्डधारकांनी धान्याची उचल करताच त्यांच्या मोबाइलवर एमएमएस येईल. त्यावर धान्य किती किलो मिळाले, किती सदस्यांचे मिळाले, याची माहिती असेल. त्यामुळे मोबाईल सिडिंग करणे गरजेचे आहे.
मोबाइल नंबर दिला आहे का? कुटुंबातील सदस्यांचा मोबाइल क्रमांक रेशन कार्डाच्या क्रमांकाशी जोडण्यात येणार आहे. दर महिन्याचे धान्य मिळाल्यानंतर कार्डधारकांनी धान्याची उचल करताच त्यांच्या मोबाइलवर एमएमएस येईल.
अंत्योदय– प्रतिकार्ड गहू, तांदूळ मिळून ३५ किलोग्रॅम धान्य देण्यात येते.
प्राधान्य– कार्डवरील प्रतिव्यक्ती ५ किलोग्रॅम धान्य दिले जाते.
शेतकरी– कार्डवरील प्रतिव्यक्ती ५ किलोग्रॅम धान्य दिले जाते.

प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचे मोबाइल क्रमांक सिडिंग करण्यात येत आहे. ज्या कार्डधारकांनी मोबाइल क्रमांक दिलेला नाही. त्यांनी संबंधित दुकानदारासोबत संपर्क करून मोबाइल क्रमांक सिडिंग करून घ्यावा. यामुळे धान्य आल्याचा तसेच किती धान्य मिळाले यासंदर्भातील माहिती महिन्याचे धान्य मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना मिळणार आहे.