सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात भरती
या पदांसाठी भरती:- सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात प्रोग्रॅम ऑफिसर आणि अकाउंटंट या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अतिरिक्त जागा भरल्या जाणार:- प्रोग्रॅम ऑफिसर या पदाची 2 रिक्त जागा आणि अकाउंट या पदाची 1 रिक्त जागा अशा दोन रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता:- प्रोग्रॅम ऑफिसर पदासाठी सामाजिक कार्य, समाजशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेले उमेदवार किंवा मान्यप्राप्त विद्यापीठ अथवा संस्थेतून विशेष शिक्षण विषयात एमएड पदवी मिळवलेले उमेदवार पात्र राहणार आहेत. यासोबतच उमेदवाराला कम्प्युटरचे विशेषता एमएस वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंटचं सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.
तसेच अकाउंटंट या पदासाठी कॉमर्समधील पदवीधर उमेदवार यासाठी पात्र राहणार आहे. सोबतच उमेदवाराला टॅली, एमएस वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंटच सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.
कामाचा अनुभव अन वयोमर्यादा:- या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील किमान दहा वर्षाचा अनुभव असावा. या पदासाठी किमान 45 आणि कमाल 62 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत.
अर्ज करण्याची पद्धत:- यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज उपलब्ध असून इच्छुक आणि पात्र उमेदवार येथून अर्ज घेऊ शकतात.
अर्ज उमेदवाराने काळजीपूर्वक भरल्यानंतर अवर सचिव (धोरण), डिपार्टमेंट ऑफ इम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसएबिलिटी (दिव्यांग), रुम नंबर 520, पाचवा मजला, बी-II विंग, दीनदयाळ अंत्योदय भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली – 110003 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची अंतिम मुदत:- इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज 31 मे 2023 पर्यंत वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवू शकणार आहेत.