महापारेषण सहाय्यक तंत्रज्ञ पदाच्या १८६८ जागांची अपडेट
सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) या पदाची १०० टक्के रिक्त पदे सरळसेवा भरतीन्वये भरण्याकरीता दि. ११.०५.२०२३ रोजी महाव्यवस्थापक (मासं-मबनि), उप महाव्यवस्थापक (मासं-मबनि) व सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं- सेप्र) यांनी क्षेत्रिय कार्यालयातील सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं) व व्यवस्थापक (मासं), भार प्रेषण केंद्र, ऐरोली यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेवून सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) या पदाच्या सामाजिक व समांतर आरक्षणासह रिक्त पदांची विभागनिहाय व परिमंडलनिहाय एकत्रित केलेली माहिती सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं- सेप्र) यांच्याकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्याप्रमाणे, सर्व परिमंडल कार्यालयांकडून दि. १७.०५.२०२३ पर्यंत प्राप्त झालेल्या माहितीचे संकलन केल्यानंतर, परिमंडलनिहाय सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) या पदाच्या रिक्त पदांची स्थिती खालीलप्रमाणे दिसुन आली आहे. त्यानुसार, सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) या पदाची खालीलप्रमाणे एकूण १८६८ रिक्तपदांची माहिती प्राप्त झाली आहे.
सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) हे पद विभागस्तरीय सेवा जेष्ठता यादीमध्ये येणारे पद आहे. सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) हे पद सरळसेवेने भरावयाचे पद असून सदर पदाची जाहिरात प्रकाशित करुन रिक्तपदे भरावयाच्या अनुषंगाने या पदाच्या रिक्तपदांच्या सामाजिक व समांतर आरक्षण निहाय (जसे की महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, खेळाडु, अपंग, अनाथ) अचुक माहिती सादर करणे आवश्यक आहे.
सबब, आपणांस विनंती करण्यात येते की, आपल्या परिमंडल कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या रिक्त पदांची, सामाजिक अनुशेषाची व समांतर आरक्षणाची विभागीय कार्यालय स्तरावरील आणि परिमंडल स्तरावरील एकत्रित माहितीची परत एकदा खात्री करुन घ्यावी व ती सोबत जोडलेल्या प्रपत्रात प्रमाणित करून उलट टपाली पत्राद्वारे दि. २२.०५.२०२३ पर्यंत निम्न स्वाक्षरीधारकास पाठवावी.

अउदा प्रकल्प नि संवसु परिमंडल, अमरावती – ९०
अउदा प्रकल्प नि संवसु परिमंडल, औरंगाबाद – ३३८
अउदा प्रकल्प नि संवसु परिमंडल, नागपूर – २४
अउदा प्रकल्प नि संवसु परिमंडल, नाशिक – ३१७
अउदा प्रकल्प नि संवसु परिमंडल, पुणे – ४३२
अउदा प्रकल्प नि संवसु परिमंडल, कराड – ३४५
अउदा प्रकल्प नि संवसु परिमंडल, वाशी – ३१३
भार प्रेषण केंद्र, ऐरोली – ०९
एकूण – १८६८