कोतवाल संवर्गाच्या पदभरती संदर्भात सुधारीत मार्गदर्शन GR जारी….
क्र.केओटी-२०१२/प्र.क्र.४३२/ई-१०, दिनांक ०५ सप्टेंबर, २०१३ च्या शासन निर्णयातील परिच्छेद-१ येथील सुधारित नियम व मार्गदर्शक तत्वांमधील अनुक्रमांक (४) व (५) च्या तरतूदी अधिक्रमित करण्यात येत असून त्याऐवजी पुढीलप्रमाणे तरतूदी लागू करण्यात येत आहे.

कोतवाल संवर्गाची पदे नामनिर्देशनाने भरतांना १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात यावी. लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे ५० प्रश्न असावेत. त्यानुसार सदर लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात यावी.
महसूल व वन विभागाच्या संदर्भीय शासन निर्णय नामनिर्देशनाव्दारे पदभरती करतांना बिंदुनामावलीची अंमलबजावणी संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या प्रचलित शासन निर्णयातील तरतूदींची अंमलबजावणी करावी व आरक्षण कायद्यातीलतरतुदींचे पालन करावे.
महसूल व वन विभागाच्या संदर्भीय शासन निर्णय दिनांक ०५ सप्टेंबर, २०१३ च्या शासन निर्णयातील उर्वरित तरतूदींमध्ये कोणताही फेरबदल केला नसून सदरच्या तरतूदी जशाच्या तशाच लागू राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेताक२०२३०५१७११२८०४८२१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुनकाढण्यात आला आहे.