Take a fresh look at your lifestyle.

अन्न प्रक्रिया उद्योजकांसाठी सुवर्णसंधी तीन कोटींपर्यंत अनुदान

0

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना सन २०२०-२१ पासून ते सन ते २०२४-२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक मालकी भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, खासगी कंपनी या शासकीय व खासगी वैयक्तिक तसेच संस्थांना एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत अनुदान लाभ देय आहे.

तर सूक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगांना सामाईक पायाभूत सुविधांकरिता गट लाभार्थी, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, स्वयंसहायता गट आणि त्यांचे फेडरेशन शासकीय संस्थांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के, जास्तीत जास्त तीन कोटींपर्यंत अनुदान लाभ मिळणार आहे. मार्केटींग व ब्रेडिंगकरिता पात्र प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के, कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहीत करण्यात येईल. तसेच सूक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के, जास्तीत जास्त तीन कोटी आहे.

संपर्क करण्याचा पत्ता- केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी केंद्र शासनाच्या https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. तसेच अधिक माहितीसाठी जवळील कृषी विभागाच्या कार्यालयांशी संपर्क साधता येईल.

कंपन्या, शेतकरी बचतगट, महिला शेतकरी, युवक, उद्योजक, शेतकरी बचतगट, विविध कार्यकारी संस्था आदी जण अर्ज करु शकतात.