इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅडमी अंतर्गत ‘कमर्शियल पायलट लायसेंस कोर्स’ करिता अर्ज करण्याचे आवाहन
इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अॅकेडमी (आयजीआरयूए), चार बॅचेसमध्ये १७ ऑगस्ट २०२३ पासून सुरू होणाऱ्या कमर्शियल पायलट लायसेंस कोर्स प्रारंभाकरिता अर्ज मागवीत आहे.

पात्रता:-
(i) १०+२ मध्ये इंग्रजी, गणित आणि फिजिक्ससह उत्तीर्ण असावेत किंवा समकक्ष आणि
वरील प्रत्येक विषयामध्ये सामान्य प्रवर्गातील उमेदवारांकरिता ५०% आणि अजा,
अजजा, ईडब्ल्यूएस आणि इमाव (नॉन क्रिमिलेअरशी संबंधित) प्रवर्गातील
उमेदवारांकरिता ४५% किमान गुण प्राप्त केले असावेत.
(ii) वैवाहिक स्थिती सिंगल, अविवाहित
(iii) उंची किमान १५८ सें.मी. आणि कमाल १८५ सें.मी.
प्रशिक्षण शुल्क रु. ४५ लाख आहे अधिक बोडिंग- लॉजिंग आणि इतर खर्च अतिरिक्त.
सविस्तर माहिती आणि अर्जाचा नमुना इत्यादीकरिता कृपया आयजीआरयूए वेबसाइट
https://igrua.gov.in वर “एंट्स” ला भेट द्या.
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख २३ एप्रिल २०२३ आहे (शुल्काचा भरणा ऑनलाईन पध्दतीने करावा).
ऑनलाईन परीक्षेची तारीख १४ मे २०२३ (रविवार)
