RBI मध्ये असिस्टंट पदासाठी अर्ज करण्यापूर्वी परीक्षेचे पात्रता व निकष जाणून घ्या….
भारतीय रिझव्र्ह बँक (RBI) असिस्टंट भरती २०२३ ची अधिसूचना लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. आरबीआय असिस्टेंट २०२३ पीडीएफ डाउनलोड करण्यासाठीची लिंक भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उपलब्ध करण्यात येणार आहे.
भारतीय रिझव्र्ह बँक असिस्टंट पदासाठी पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी दरवर्षी आरबीआयकडून असिस्टंट परीक्षा घेतली जाते. या परीक्षेची अनेक उमेदवार आतुरतेने वाट पाहात असतात.
कारण अनेकांना त्यांना बँकिंग सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा असते. यासाठीच आम्ही तुम्हाला RBI असिस्टंट २०२३ शी निगडीत काही महत्वाची माहिती देणार आहोत. ज्यामध्ये अभ्यासक्रम परीक्षा तारीख, पगार, पात्रता, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, इत्यादीचा समावेश आहे. RBI सहाय्यक २०२३ अधिसूचना- आरबीआय असिस्टंट २०२३ अधिसूचना PDF मार्च २०२३ मध्ये जारी होण्याची अपेक्षा आहे. शिवाय विद्यार्थ्यांना या परीक्षे संदर्भातील सर्व माहिती विद्यार्थ्यांना असणं आवश्यक आहे.
परीक्षेचे नाव:– RBI परीक्षा २०२२
पोस्ट:– असिस्टंट
रिक्त जागा:– अद्याप जाहीर केलेल्या नाहीत
श्रेणी:– बँक नोकरी
नोकरीचे ठिकाण:– संपूर्ण भारतात कुठेही
भत्ता:– भत्ते महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, विशेष भत्ता, वाहतूक भत्ता.
परीक्षेची भाषा:– इंग्रजी आणि हिंदी
निवड प्रक्रिया:– Prelims and Mains
अर्जाची पद्धत:– ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट:– http://www.rbi.org.in
शैक्षणिक पात्रता:- उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदवी किंवा समतुल्य पदवी प्राप्त केलेली असावी.
SC/ST/PWD मधील उमेदवारांसाठी, एकूण उत्तीर्ण गुण आवश्यक आहेत.
वयोमर्यादा:– किमान २० वर्षे तर कमाल २८ वर्षे
शिवाय या भरतीसाठीच्या प्र्त्येक अपडेटसाठी तुम्ही

बॅंकेच्या या http://www.rbi.org.in अधिकृत वेबसाईटला अवश्य भेट द्या.