CGL साठी होणार 37 हजारांहून अधिक पदांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) कम्बाइन्ड ग्रॅज्युएट लेव्हल (CGL) परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. आयोगाने भरतीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार १ एप्रिल २०२३ पासून अर्जाची प्रक्रिया सुरू होईल. त्याचबरोबर उमेदवारांना १ मेपर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ssc.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन देखील अर्ज करू शकतील.

या विभागांमध्ये नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
भरतीद्वारे केंद्र सरकारची मंत्रालये, विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त्या केल्या जातील. पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आयोगाच्या या भरतीतून हजारो पदे भरली जातील, असे मानले जात आहे. मात्र, आयोगाकडून रिक्त पदांच्या संख्येची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
आयोग सध्या २०२२ च्या परीक्षेची तयारी करत आहे. २०२२च्या भरतीद्वारे ३७ हजार पदांसाठी नियुक्त्या केल्या जात आहेत. अधिक तपशील उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.
याप्रमाणे अर्ज करा- सर्वप्रथम ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर CGL Recruitment लिंकवर क्लिक करा. यानंतर CGL 2023 चा फॉर्म भरा.