Take a fresh look at your lifestyle.

पदवीधर उमेदवारांसाठी गोल्डन चान्स; TCS करणार मोठी पदभरती

0

गेल्या वर्षी (नोव्हेंबर 2022) इन्फोसिस या आयटी कंपनीचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन यांनी नोकरी शोधणाऱ्या तरुणांना आशेचा किरण दाखवला होता.

बेंगळुरू टेक समिटच्या 25व्या एडिशनमध्ये बोलताना गोपालकृष्णन म्हणाले होते की, महागाई आणि अमेरिकेतील मंदी यांसारख्या समस्यांमध्येही भारतीय आयटी क्षेत्रात दोन लाख नवीन कर्मचाऱ्यांना नोकरी मिळेल. त्यांचं हे वक्तव्य खरं होताना दिसत आहे. टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टीसीएस या आयटी कंपनीनं तंत्रज्ञांची नियुक्ती सुरू केली आहे. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

कंपनी सध्या डेटा इंजिनीअर्स, डेटा आर्किटेक्ट आणि डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन्स (डेव्हऑप्स) आर्किटेक्ट्सच्या शोधात आहे. ‘टेकगिग’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

डेटा इंजिनीअर्स: टीसीएसला आपल्या भारतभरातील कार्यालयांमध्ये डेटा इंजिनीअर्सची आवश्यकता आहे. डेटा इंजिनीअर पदावर काम करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना पुढील भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडव्या लागतील.

1. क्लाउड बिगक्वेरी, क्लाउड डेटाफ्लो, पब-सब, क्लाउड बिग टेबल आणि एआय/एमवन सोल्युशन्स वापरून गुगल क्लाउड प्लॅटफॉर्मवर (जीसीपी) डेटा इंडिनीअरिंग सोल्युशन शोधणं.2. इच्छुक उमेदवारांना जीसीपीचा पुरेसा अनुभव असला पाहिजे.

3. उमेदवारांची पायथॉन/जावा, पेस्पार्क/ स्पार्क जावा या कॉम्प्युटर लँग्वेजवर चांगलं प्रभुत्व असलं पाहिजे.

4. उमेदवारांना जीसीपी बिग क्वेरीचं चांगलं ज्ञान असलं पाहिजे.

5. उमेदवारांना जीसीपी पब-सबचं चांगलं ज्ञान असलं पाहिजे.

डेटा आर्किटेक्ट्स: टीसीएसला बेंगळुरू येथील कार्यालयात डेटा आर्किटेक्ट्सची आवश्यकता आहे. डेटा आर्किटेक्ट पदावर काम करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना पुढील भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडव्या लागतील.

1. स्पार्क, एचडीएफएस, पिग, हाइव्ह, स्टॉर्म, एचबेस, टेराडेटा, टॅब्लू, गुगल बिग क्वेरी, टेडाप्रोक, लॉकर, एआय प्लॅटफॉर्म, ऑटोएमएलसारख्या हडूप आणि बिग डेटा टेक्नॉलॉजीचा वापर करून काम करण्याचा पुरेसा अनुभव असणं गरजेचं आहे.

2. डेटाफ्लो, क्लाउड कंपोझर, क्लाउड डेटा फ्युजन, क्लाउड पब/सब, डेटा कॅटलॉग, डेटा स्टुडिओ, क्लाउड आएएम, क्लाउड रन, गुगल क्युबरनेट्स इंजिन, गुगल कॉम्प्युट इंजिन, क्लाउड स्टोरेज, क्लाउड आयएएम यासारख्या गुगल सर्व्हिसेसचा विस्तृत हँड्स-ऑन अनुभव आवश्यक आहे.

डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन्स (डेव्हऑप्स) आर्किटेक्ट्स: टीसीएसला बेंगळुरू येथील कार्यालयात डेव्हऑप्स आर्किटेक्ट्सची आवश्यकता आहे. डेव्हऑप्स आर्किटेक्ट पदावर काम करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना पुढील भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडव्या लागतील.

1. इच्छुक उमेदवार कंपनीतील डेव्हलपमेंट प्रोसेस आणि ऑपरेशन्स सुलभ करण्यासाठी जबाबदार असेल.

2. टीममधील सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडे उत्कृष्ट नेतृत्व कौशल्ये असली पाहिजेत.

3. पदाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्यासाठी उमेदवाराकडे सर्व डेव्हऑप्स पद्धती व्यवस्थित करण्याची क्षमता असली पाहिजे.

4. टेक्निकल ऑपरेशन्सचं पुनरावलोकन करण्यास आणि योग्य टूल्स व टेक्निक्सचा वापर करून प्रक्रिया स्वयंचलित करण्यास उमेदवार सक्षम असला पाहिजे.