नवोदय विद्यालयासाठी प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ
जवाहर नवोदय विद्यालयाने शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी इयत्ता 6 वी साठी रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. नववीच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा होणार आहेत. यासाठी पात्र अर्जदारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रता निकष पूर्ण करणारे इच्छुक अर्जदार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्जांची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२३ होती, परंतु ती आता ८ फेब्रुवारी २०२३ आहे. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन प्रक्रियेतून सोपी करण्यात आली आहे. प्रवेश चाचणी परीक्षा 2023 साठी डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाईल, टॅबद्वारे नवोदय विद्यालय समिती या ovin/nvs/en/Home1 किंवा https://cbseitms.nic.in/ या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अर्ज सादर करताना आधार कार्ड, मुख्याध्यापकाचे पत्र (स्टडी सर्टिफिकेट), फोटो, सही आवश्यक आहे. निवड परीक्षा 29 एप्रिल रोजी होणार असल्याचे जवाहर नवोदय विद्यालयाचे डॉ. मनोज वानखडे नवोदय परीक्षा प्रभारी यांनी सांगितले.