Take a fresh look at your lifestyle.

IT क्षेत्रात जॉब शोधणाऱ्यांसाठी सर्वात मोठी संधी..!

0

अमेरिकेमध्ये आर्थिक मंदीच्या संकटाची चाहूल लागल्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्माचारी कपात सुरू केली आहे. असं असलं तरीही भारतीय आयटी क्षेत्रातून एक चांगली बातमी समोर आली आहे. आयटीमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे.

टेक जायंट गुगलनं फुल स्टॅक इंजिनीअर आणि सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर पदासाठी कर्मचारी भरती सुरू केली आहे. कंपनीच्या बेंगळुरू येथील कार्यालयामध्ये या कर्मचाऱ्यांची गरज आहे. ‘टेक गिग’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअरपदाच्या पात्रता
1. बॅचलर पदवी किंवा समतुल्य प्रत्यक्ष कामाचा अनुभव पाहिजे.

2. एक किंवा अधिक प्रोग्रॅमिंग भाषांमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डेटा स्ट्रक्चर्स/अल्गोरिदमचा पाच वर्षांचा अनुभव पाहिजे.

3. सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्सची चाचणी, देखरेख किंवा लाँच करण्याचा तीन वर्षांचा अनुभव आणि सॉफ्टवेअर डिझाइन आणि आर्किटेक्चरचा 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

4. एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टममध्ये काम करण्याचा तीन वर्षांचा अनुभव गरजेचा आहे.

फुल स्टेक इंजिनीअरपदाच्या पात्रता:-
1. पदव्युत्तर पदवी किंवा कॉम्प्युटर सायन्स विषयातील पीएच.डी. किंवा संबंधित तांत्रिक क्षेत्रातील अनुभव गरजेचा आहे.

2. फुल स्टॅक डेव्हलपमेंटमध्ये दोन वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. याशिवाय, जावा, पायथॉन, गो, C++ कोडबेसेस, जावा स्क्रिप्ट, टाइप स्क्रिप्ट, एचटीएमएल, सीएसएस, इत्यादींसह फ्रंट-एंड अनुभव असला पाहिजे.

3. अॅक्सेसेबल तंत्रज्ञान विकसित करण्याचा अनुभव पाहिजे.