मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम अंतर्गत पास झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार 75 हजार रुपये मानधन….
“मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” पुन्हा सुरु करण्याचा
निर्णय शासनाने घेतला आहे. सदर कार्यक्रमाची
अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने
फेलोंच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती निश्चित करण्याच्या दृष्टीने तसेच नामांकित शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्याच्या दृष्टीने सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

निवडीची कार्यपद्धती
■ फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे.
■ परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा Online ( Objective Test) द्यावी लागेल,
■ ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचालनालयाच्या mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल व त्यातील अटी व शर्तीचे उमेदवाराने पालन करणे आवश्यक राहील.
■ देशातील प्रमुख शहरे आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. तथापि, प्राप्त अर्जाची संख्या विचारात घेता उमेदवारास उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्राबाबत अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचा निर्णय अंतिम राहील.
यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले
फेलो पुनश्चः या कार्यक्रमांतर्गत फेलो निवडीसाठी पात्र
असणार नाहीत. तसे फेलोंनी अर्जात नमूद करणे
आवश्यक राहील.
■वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण
मिळविणाऱ्या २१० उमेदवारांना विशिष्ट कालावधीत
दिलेल्या विषयांवरील निबंध ऑनलाईन सादर करावे
लागतील.
■वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण
मिळविणाऱ्या २१० उमेदवारांची मुलाखत मुंबई येथे
घेण्यात येईल.
विद्यावेतन ( छात्रवृत्ती ):- सदर कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये ७०,०००/-
व प्रवासखर्च रुपये ५,०००/- असे एकत्रित रुपये
७५,०००/- छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.