Take a fresh look at your lifestyle.

आपल्या आधार कार्डच्या ‘या’ समस्या करा दूर; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

देशात आधार कार्ड हे महत्वाच्या कागद पत्रपैकी एक कागद पत्र आहे. आधारकार्ड चा वापर हा संपूर्ण देशात शासकीय कामासाठी केला जातो. आधारकार्ड हे लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत लागणारे कागद पत्र आहे. प्रत्येक ठिकाणी आधारकार्ड हे आपल्याला मागितले जाते.

परंतु काही लोकांच्या आधारकार्ड मध्ये काही अडचणी आल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी UIDAI ने एक चांगली सेवा चालू केली आहे. आधारकार्ड असणाऱ्या लोकांसाठी UIDAI ने एक टोल फ्री नंबर तयार केलेला आहे. या नंबरवर आपण कॉल करून आपल्याला आलेल्या अडचणी सांगून त्याचे निराकरण करू शकतो.

ग्राहकांसाठी UIDAI सतत कोणत्या ना कोणत्या सुविधा नेहमी आणत असते. त्या आधार कार्ड मूळ आपल्याला वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेता येतो. UIDAI ने IVR तंत्रज्ञांच्या आधारावर नवीन सुविधा चालू केली आहे . ही सुविधा २४ तास चालू असणार आहे. त्याच बरोबर महत्वाचे म्हणजे या सुविधेसाठी आपल्याला कोणताही चार्ज भरावा लागणार नाही. याचा अर्थ असा की ही सुविधा तुम्हाला पूर्णपणे मोफत असणार आहे.

UIDAI ने आपल्यासाठी १९४७ हा नंबर बनवला आहे. हा नंबर टोल फ्री असणार आहे. यावर कॉल करून आपल आपल्याला आधारकार्ड बद्दल असणाऱ्या सर्व अडचणी चे निराकरण करू शकतो. त्याच बरोबर हा UIDAI चां नंबर तब्बल १२ भाषांमध्ये वापरला जातो. UIDAI ने असे सांगितले आहे की आपण कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी हा नंबर आपण वापरू शकतो. या नंबरचा वापर करून आपण आधार कार्ड साठी नोंदणी, आधारकार्ड अपडेट ,तसेच PVC कार्ड ची स्थिती माहित करून घेण्यासाठी वापरला जातो. आधार कार्ड वर येणाऱ्या अडचणी या साधारण १९४७ या नंबर चा वापर करून सोडवल्या जाऊ शकतात.