Take a fresh look at your lifestyle.

घरेलू कामगारांना सन्मानधन योजनेतंर्गत मिळणार आर्थिक सहाय्य….

0

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे दिनांक
३१.१२.२०१२ रोजी वयाची ५५ वर्ष पूर्ण केलेल्या नोंदित व मागील सलग २ वर्ष जिवीत नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून “सन्मानधन योजना २०२२ अंतर्गत रूपये १०,०००/- एवढी रक्कम खालील अटींच्या अधिन राहून थेट – त्यांच्या बँक खात्यात डिबीटीव्दारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

१. लाभार्थ्याना अर्थ सहाय्य वितरीत करण्यापुर्वी सदर
लाभार्थी प्रत्यक्ष नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त (असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करुन घेण्यात यावी.

२. अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टीकोनातून विकास आयुक्त (असंघटीत कामगार) यांनी कार्यपध्दतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत. त्यामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम, २००८ कलम १५ (३) मधील तरतूद सर्व जिल्हास्तरावरील कार्यालय प्रमुखाना देखील तंतोतंत लागू राहील, याचा उल्लेख करावा.

३. सदर अर्थसहाय्याचे वाटप जलदगतीने होण्याच्या
दृष्टीकोनातून व लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीकोनातून
कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय
प्रमुखामार्फत (अपर कामगार आयुक्त/ कामगार उप
आयुक्त/ सहाय्यक कामगार आयुक्त/ सरकारी कामगार अधिकारी अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे.

४. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरीत करावा.

५. वरील कार्यपध्दतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप
देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरच नियंत्रण व
समन्वयन विकास आयुक्त (असंघटित कामगार ) यांनी करावे. वरील आर्थिक लाभ वाटपासाठी विशेष मोहिम हाती घेऊन, सदरची कार्यवाही दि. ३१ मार्च, २०२३ पुर्वी पूर्ण करुन खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे व तपशील विकास आयुक्त (असंघटित कामगार) कार्यालयाने शासनास दरमहा सादर करावा.

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम, २००८ च्या कलम २२ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.