Take a fresh look at your lifestyle.

NEET आणि JEE mainजानेवारी अन् एप्रिलमध्ये..!

0

नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्‍यानुसार जेईई मेन्‍स परीक्षा जानेवारी आणि एप्रिल अशा दोन सत्रात घेतली जाणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट परीक्षा ७ मेस तर कॉमन युनिव्‍हर्सिटी एट्रन्‍स एक्‍झाम (सीयुईटी २०२३) परीक्षा मे अखेरीस घेतली जाणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता विविध अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांची तयारी करता यावी, या उद्देशाने एनटीए यांच्‍यातर्फे प्रवेश परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक प्रसिद्ध केलेले आहे. राष्ट्रीय स्‍तरावरील इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) व अन्‍य संस्‍थांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी जॉइंट एन्ट्रन्स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स परीक्षा घेतली जाणार आहे.

२०२३ मध्ये विद्यार्थ्यांना जेईई मेन्‍ससाठी दोन सत्र उपलब्‍ध असतील. ऑनलाइन संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍स्‍ड टेस्‍ट) ही परीक्षा असणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी नॅशनल इलिजिब्‍लीटी कम एट्रन्‍स टेस्‍ट (नीट) परीक्षा ऑफ लाईन पद्धतीने पार पडत असते.