Take a fresh look at your lifestyle.

तरुणांसाठी खुशखबर; राज्यात या क्षेत्रात लवकरच निघणार ५५ हजार रोजगार….

0

उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या चौथ्या बैठकीत राज्यात ७० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे सुमारे रोजगारनिर्मिती ५५ हजार होणार आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागांतील औद्योगिक विकासाला चालना देण्याऱ्या उद्योगांबाबत या बैठकीत चर्चा झाली.

मंत्रालयात मंगळवारी उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते.

इलेक्ट्रिक व्हेईकल निर्मितीचा पहिला प्रकल्प:- देशाच्या व राज्याच्या इलेक्ट्रॉनिक व्हेईकल पॉलिसीनुसार देशातील इलेक्ट्रिक व्हेईकल निर्मितीच्या क्षेत्रातील दहा हजार कोटींची गुंतवणूक असलेला महिदा इलेक्ट्रिक व्हेईकल ऑटोमोबाईल्सचा पहिला प्रकल्प पुणे येथे सुरु होणार आहे. या माध्यमातून राज्यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारीत प्रकल्पांमध्ये विदेशी गुंतवणूक होणार असून व्होक्सवॅगनबरोबर पुणे इथे तंत्रज्ञान, संशोधन व विकास संदर्भात प्रोटोटाइप बनविण्यात येणार आहे.

बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या निप्रो फार्मा पॅकेजिंग कंपनी पुणे जिल्ह्यामध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारीत फार्मास्युटिकल ग्लास टयूबिंगचे उत्पादन करणार आहे. यासाठी ही कंपनी दोन टप्प्यात १६५० कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष २००० लोकांना रोजगार मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्यात येत्या वर्षभरात ७५ हजार सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर, महाराष्ट्रातून अनेक मोठे प्रकल्प गुजरातला जात असल्याचा मुद्दा राजकीय ऐरणीवर आला असताना, भारत केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केले असून, त्यातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत’, अशी आकडेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

पंतप्रधानांच्या घोषणेनुसार राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ७५ हजार उमेदवारांना शासकीय नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. यातील कोकण विभागातील पात्र उमेदवारांना राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याअंतर्गत नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी येथे झाला. या पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमात ६०० उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.