Take a fresh look at your lifestyle.

राज्यात 3628 जागांसाठी तलाठी भरती; नवीन GR जाहीर

0

अ.मु.स. (सेवा), सामान्य प्रशासन विभाग व सचिव (व्यय), वित्त विभाग यांच्या उप समितीने दि.२८.१.२०२२ रोजी दिलेल्या मान्यतेनुसार व मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चस्तरीय सचिव समितीने दि. २९.०४.२०२२ रोजी दिलेल्या मान्यतेप्रमाणे तलाठी साझा पुनर्रचनेनुसार

विहीत केलेल्या निकषाच्या अनुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त यांचेकडून महसूली विभागनिहाय प्राप्त माहितीस अनुसरुन वाटप करण्यात आलेल्या ३११० तलाठी साझे व ५१८ महसूली मंडळ कार्यालयांसाठी ३११० तलाठी व ५१८ मंडळ अधिकारी असे खालीलप्रमाणे एकूण ३६२८ पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.