Take a fresh look at your lifestyle.

शासनाचा निर्णय: शासनाकडून सुधारित वेतनस्तर मंजूर

0

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथील लघुलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने १६ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार लघुलेखकांच्या विविध श्रेणींसाठी ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनस्तर मंजूर करण्यात आले आहेत.

राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ च्या शिफारशींनुसार करण्यात आलेल्या या बदलामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे. सुधारित वेतन संरचनेनुसार लघुलेखक (निवडश्रेणी) यांचा वेतनस्तर एस-१६ वरून एस-१७, लघुलेखक (उच्चश्रेणी) एस-१५ वरून एस-१६ तर लघुलेखक (निम्नश्रेणी) एस-१४ वरून एस-१५ करण्यात आला आहे.

यशदा येथील लघुलेखक संवर्गातील वेतनातील त्रुटी दूर करण्याची मागणी दीर्घकाळ प्रलंबित होती. शासनाच्या या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून वेतनातील तफावतही दूर होणार आहे.